Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना वाढत आहे, सरकारने ते गांभीर्याने घेतले पाहिजे, मुख्यमंत्री अयोध्येला (CM Ayodhya Tour) जाणार असतील तर जा, मात्र मग त्यांच्याशिवाय जे कोण प्रमुख असलतील त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा प्रकार सगळ्यांनीच थांबवाव, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वत:पासून करावी असा टोलाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. ते बारामती होस्टेलमध्ये कार्यकर्ता, पदाधिकारी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

 

 

वादग्रस्त वक्तव्ये (Controversial statements) करूच नये, घटनेने दिलेल्या अधिकारातच बोलावे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडतूस, काडतूस यावर वक्तव्यावर बोलताना सांगितले. बालभारती पौड रस्त्याबाबत (Balbharti Paud Road) ते म्हणाले, त्यांनी भविष्याचा विचार करुन असे प्रकल्प करावेत. वसुंधरेला धक्का लागणार नाही, पुढच्या पिढीला आपण काही ठेवतो आहोत किंवा नाही याचा विचार केला जावा. पुण्यातील वाहतूक (Pune Traffic) सुसह्य करण्यासाठी जे काही करता येण्यासारखे आहे ते करायला हवे, स्थानिक नागरिकांनीही यात आपली काही जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे.

 

ज्या ठिकाणी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होईल त्याठिकाणी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटली जाईल,
असे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी म्हटले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, म्हणू द्या की त्यांना,
त्यामुळे त्यांचे समाधान होणार असेल तर त्यांना आडकाठी कशासाठी करायची? सत्ताधाऱ्यांना आम्ही काही सांगायला गेलो की ते आम्हालाच सांगतात,
तुमच्या काळातही तसंच होतं होतं. म्हणजे आम्ही चूक केली तर तुम्हीही चूक करणार का?
परंतु ते ऐकण्याच्या मनस्तितीत नाहीत, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

 

Web Title :- Ajit Pawar | chandrakant patil should stop talking controversially ajit pawars


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांना कामाला लावलंय, घरात बसणारे रस्त्यावर येऊ लागले’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Department of Registration and Stamps Pune | मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही, विरोधानंतर नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! हेज् अँड सॅचे्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत