NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी शिंदे- फडणवीस सरकारला फटकारले, म्हणाल्या – सण, मेळावे, भेटीगाठी जर संपल्या असतील तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | दिवाळी पहाट कार्यक्रम, गाठीभेटी, पक्षप्रवेश, आयोध्येला जाण्याचे नियोजन, यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यापासून दंग आहे, आपण शिवसेना (Shivsena) कशी फोडली याच्याच कथा अजूनही ठिकठिकाणी जाऊन मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) सांगत आहेत, तर दुसरीकडे अतिवृष्टी (Heavy Rain) आणि परतीच्या पावसाने शेतकरी (Farmer) देशाधडीला लागला आहे. शेतकरी आणि विरोधी पक्ष ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी करत आहेत, पण सरकार दुर्लक्ष करत आहे. बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे राज्यात एकुणच संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे.

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेते हे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी करत आहेत. जर सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील आणि कुणाला वेळ मिळाला आणि ते जर शेतकर्‍यांच्या बांधावर गेले, तर त्यांना परिस्थिती काय आहे कळेल. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे.

 

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, प्रसारमाध्यमांद्वारे सुद्धा अनेक घटना बघायला मिळाल्या, काही आम्हाला आमच्या मतदारसंघात, जिल्ह्यातही बघायला मिळाल्या. मला सर्वात वेदना देणारी जर कुठली गोष्ट मी पाहीली असेल तर मागील काही दिवासांत, एक सोशल मीडियावरच माझ्याकडे एक व्हिडीओ आला होता, तो यवतमाळच्या शेतकर्‍याचा होता. तो एवढच म्हणत होता की चिन्ह आणि या सगळ्या लढाया सोडून, आताच्या सरकारने थोडासा वेळ हा जर शेतकर्‍यांसाठी दिला तर खूप बरे होईल. प्रचंड वेदना देणारा तो व्हिडीओ होता.

 

मुलीच्या आवाजातील एक पाच मिनिटांचा व्हिडीओही माझ्याकडे आला होता,
तो आम्हालाही उद्देशून होता की सगळ्या आमदार, खासदारांना हा व्हिडीओ दाखवा की आज शेतकरी किती अडचणीत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे की, कोविडच्या काळात सगळे लॉकडाउनमध्ये होते.
परंतु एक व्यक्ती असा होता की जो सातत्याने काम करत होता. तो म्हणजे या देशातील शेतकरी.
कोविडच्या काळात अनेक गोष्टी कमी पडल्या, पण अन्न अजिबात कमी पडू दिले नाही आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे देशातील,
काळ्या मातीशी इमान राखणार्‍या शेतकर्‍याला जाते.

 

खासदार सुळे (NCP MP Supriya Sule) पुढे म्हणाल्या,
हे असंवेदनशील सरकार आहे आणि मंत्रालयात येऊन आढावा घेणे, बांधावर जाऊन आढावा घेणे हे काहीच आपल्याला दिसत नाही.
मला असे वाटते कोणतरी तीन महिन्यांचा आढावा घ्यावा, की मंत्रीमंडळाच्या बैठका किती झाल्या?, मंत्रालयात कितीवेळ हे सरकार होते?,
दौर्‍यावर जेव्हा हे सरकार होते तेव्हा ते मेळाव्यासाठी होते की जनतेसाठी होते?,
जिल्हाधिकार्‍यांचा प्रत्यक्ष कितीवेळा आढावा घेतला?, पालकमंत्री किती आढावा घेत आहेत?

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | demanding to declare wet drought in the state mp supriya sule criticized the shinde-fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर यांना राज ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही, मनसेचा खोचक टोला

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय

Virat Kohli | विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ रेकॉर्ड