NCP MP Supriya Sule | ‘घरी जा, स्वयंपाक करा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी; खा. सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर पाटील यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली. यानंतर खा. सुप्रिया सुळेंना सवाल केल्यानंतर त्यांनी थेट हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. त्यावेळी त्या उस्मानाबादमध्ये (Osmanabad News) पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

 

“त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. आपण आता याकडे कसं पाहता,” असा सवाल पत्रकाराने सुप्रिया सुळेंना (NCP MP Supriya Sule) विचारला.
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “एक तर पहिल्यापासूनच मी या विषयावर काहीही बोलेले नाहीये.
मला असं वाटतं की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर काही वक्तव्य केलं असेल, त्यावर काही बोलले असतील तर माझी विनम्रपणे सगळ्या मिडियाला विनंती आहे की यावर आपण सगळे मिळून पडदा टाकूयात,” असं सुप्रिया यांनी हात जोडून पत्रकारांच्या सवालावर उत्तर देताना म्हटलं आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रिया सुळे यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं.
”आरक्षण देण्यासाठी ‘दिल्लीला जा, नाहीतर मसणात जा, देता येत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा, ” असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.
यावरुन मागील काही दिवसापासून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
पाटील यांच्यावर टीकादेखील करण्यात आली.
अखेर त्यांनी महिला आयोगाला पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

Web Title :- NCP MP Supriya Sule | NCP MP supriya sule first comment as maharashtra bjp chief chandrakant patil apologises for go home and cook remark

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा