NCP MP Supriya Sule On BJP | …क्रोनोलॉजी समजून घेतली तर हे उघड-उघड ब्लॅकमेलिंग, सरनाईक प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; म्हणाल्या – ‘आता माफी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule On BJP | शिंदे गटात (CM Eknath Shinde) गेल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना एमएमआरडीए टॅाप सिक्युरिटी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या ईओडब्ल्यूनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने सुद्धा दिलासा दिला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पुण्यात कचराप्रकरणी आंदोलन करत असताना त्यांनी भाजपाला टार्गेट केले. (NCP MP Supriya Sule On BJP)

 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने जाहीर सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी. कारण या प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर हे उघड-उघड ब्लॅकमेलिंग होते हे दिसत आहे.

 

सुळे म्हणाल्या, मी नेहमीच बारामती मतदारसंघाच्या दौर्‍यावर येते, आजही 23 गावातील कचरा प्रश्नावर आंदोलन करत आहे.
विविध सर्वेंमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसत आहे म्हणूनच मनपा निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहेत.
प्रशासक राजमध्ये जनता वार्‍यावर सोडली जात आहे.

 

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, अर्थमंत्री सीतारमण यांचे बारामती मतदारसंघात स्वागतच आहे.
ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगडं मारतात म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे.
पण जनता सुजान हे भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय. आम्ही विकासाची कामे सुरूच ठेवणार.

 

Web Title :- bjp should apologize to saranaik family say ncp mp supriya sule in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

Narayan Rane | नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत’

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू