NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गाटाने सुनावणीत आणलं ‘त्या’ व्यक्तीला समोर, अजित पवार गटाचा पर्दाफाश?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar | खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणाची याबाबत सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. सोमवारी (दि.20) झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. यामध्ये प्रताप सिंह चौधरी नावाचे शरद पवार गटाचे नेते त्यांच्या नावाचे खोटे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने सादर केल्याचे म्हटलं आहे. प्रताप सिंह चौधरी यांना शरद पवार गटाने थेट निवडणूक आयोगासमोर उभं केलं. अजित पवार गटाने केलेल्या फसवणूक व खोटी प्रमाणपत्रे यावरुन निवडणूक आयोगाने फौजदारी खटला न्यायालयात दाखल करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. (NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar)

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, निवडणूक आयोगासमोर व्यापक सुनावणी पार पडली. माझा युक्तिवाद पूर्ण झाला. आता विरुद्ध पक्षकाराचा युक्तिवाद सुरु झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आजच्या माझ्या युक्तिवादात अजित पवार गटाकडून हजारो बोगस प्रतिज्ञापत्रे, दस्तावेज आयोगासमोर दाखल केलेत ते आयोगासमोर मांडले. यामध्ये 24 प्रकराचे फ्रॉड करण्यात आले. त्यात कोणी मृत व्यक्ती आहे, अल्पवयीन मुले आहेत, झोमॅटोत काम करणारा त्यांचे प्रतिज्ञापत्रे आयोगाला दिली आहेत. (NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar)

प्रताप चौधरींचे खोटे प्रतिज्ञापत्र

आज झालेल्या सुनावणीत आम्ही विचित्र प्रसंग समोर ठेवला. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु असतानाच 27 ऑक्टोबरला अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेत. त्यात आमच्यासोबत असणारे प्रताप सिंह चौधरी यांनी अजित पवार गटाचे समर्थ केल्याचे दाखवले आहे. चौधरी यांना हे माहितीच नव्हते. त्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. आज आम्ही प्रताप सिंह चौधरी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्याचसोबत त्यांना आयोगासमोर उभं केलं. चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनचे सदस्य आहेत. त्यांना न कळवताच त्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप सिंघवी यांनी केला.

खोटी प्रतिज्ञपत्रे दाखल करणे हा गुन्हा

काहीही विचार न करता निर्लज्जपणे बोगस कागदपत्रे दाखल केली जातात. हजारो प्रतिज्ञापत्रे आहेत. आम्ही प्राथमिक स्वरुपात केवळ नऊ हजार प्रतिज्ञापत्रे दाखवलेत. निवडणूक आयोगाला अधिकार आहे. या प्रकरणी फौजदारी करावी न्यायालयासमोर न्यावी. हा एक प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा आहे. खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे दाखल करणे हा गुन्हा आहे. आम्ही अजित पवार गटाचा पर्दाफाश केला आहे. न्यायाचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

खोटी आणि दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे

अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. मात्र त्यात एकही प्रतिज्ञापत्र असे नाही
ज्यात शरद पवारांविरोधात काही लिहिलं. अजित पवारांना मी नेता मानतो असं प्रतिज्ञापत्रात आहे.
मात्र शरद पवारांच्या विरोधात मी अजित पवार गटाचे समर्थन करते असं लिहिलेले नाही.
कुठल्याही प्रतिज्ञापत्रात असे काही लिहिले नाही. खोटी आणि दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे घेतली असल्याचे सिंघवी यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने पैसे परत न केल्याच्या रागातून एकाला रॉडने मारहाण, चिंचवडमधील घटना

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार, चाकणमधील घटना; एकाला अटक

अनोळखी मयताची ओळख पटण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB) आरोपींना अटक