Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने पैसे परत न केल्याच्या रागातून एकाला रॉडने मारहाण, चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरुन तसेच जुन्या भांडणाच्या रागातून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी बाप-लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लिंक रोड चिंचवड येथे शनिवारी (दि.18) दुपारी एकच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबबत संतोष मधुकर शिरसाठ (वय-37 रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) रविवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. यावरुन सुभाष कापसे व सचिन कापसे (रा. लिंक रोड चिंचवड) यांच्यावर आयपीसी 326, 504, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष शिरसाठ हे पेंटर आहेत. शनिवारी दुपारी फिर्यादी हे त्यांचे मित्र अब्दुल गौस मुल्ला, मोहम्मद तांबोळी, साहेबु साबळे यांच्यासोबत घराच्या परिसरातील गणपती मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी सुभाष कापसे त्या ठिकाणी आला. त्याने फिर्य़ादी यांना उसने पैसे परत न देण्याच्या कारणावरुन व जुन्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ केली. तसेच सोबत आणलेला लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता आरोपी संतोष कापसे याचा मुलगा सचिन कापसे
हा रिकामी बियरची बाटली घेऊन आला. त्याने संतोष यांना शिवीगाळ करून धमकी दिली
असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | तरुणीवर हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 60 वी स्थानबध्दतेची कारवाई

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय, आरोपीला अटक; 2 महिलांची सुटका, भोसरी परिसरातील प्रकार

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार,
चाकणमधील घटना; एकाला अटक

अनोळखी मयताची ओळख पटण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB) आरोपींना अटक

विश्वचषकाचा थरार सुरु असताना पुण्यात रंगला बंदूक, तलवारीचा थरार, दरोडेखोरांकडून दारूच्या दुकानावर दरोडा

दुर्देवी! कार ओढ्यात पडून डॉक्टरचा मृत्यू

जमिनीचे खोटे बक्षीसपत्र तयार करुन व्यावसायिकाची फसवणूक, चाकणमधील प्रकार