गोपीचंद पडळकरांचा ‘तो’ व्हिडिओ राष्ट्रवादीनं आणला नव्या टॅगलाईन सोबत (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, तर त्यांना आजिबात मतदान करू नका, मी स्वत:, माझी आई, माझा भाऊ जरी निवडणुकीला उभा राहिला तरी त्यांना मतदान देऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांना केले असल्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात गाजत आहे. आता विरोधक त्यांच्या व्हिडिओचा वापर करून त्यांच्यावर टीका करत आहेत.
हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

गोपीचंद पडळकर ज्यावेळी ते धनगर आरक्षणासाठी मेळावे घेत होते, त्यावेळचे त्यांचे व्हिडीओ सध्या व्हायरल करून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. असाच एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर म्हणत आहेत की, भारतीय जनता पार्टीने जर धनगरांना आरक्षण दिले नाही तर माझ्या घरातील जरी कुणी उभं राहिलं तरी भाजपला मतदान करायचं नाही, बिरोबाची शपथ हाय, अशा प्रकारे त्यांनी लोकांना आवाहन केले होते.

आता याच शपथेची पडळकरांना आठवण करून देण्यात येत आहे. या शपथेचे आता काय झाले? शपथ घेतलेली विसरायची नाही? तुम्ही भाजपमध्ये कशामुळे सहभागी झाले? अशा अनेक प्रश्नांचा त्यांच्यावर भडीमार होत असून, त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

गोपीचंद पडळकर यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देण्यात आले आहे. ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला असून आतापर्यंत त्यांनी 5 वेळा विजय मिळवला आहे.

Visit : Policenama.com