‘चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं’ : नीलम गोर्‍हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधीपक्षांच्या नेत्यांची भूमिका चांगली आहे. आम्ही नाटक कंपनी असलो तरी ते प्रेक्षक म्हणून चांगल काम करत आहोत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता त्यांनी मी परत जाईनचा विचार करावा. तसेच चंद्रकांत पाटलांनी पण पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावे, असे खुले आव्हान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले आहे.

आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी डॉ. गोर्‍हे बोलत होत्या. औरंगाबादच्या नामकरणाची चर्चा सुरु असताना आता पुण्याचे नामकरण करण्याची मागणी भाजपने केली आहे.त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान येत्या महापालिकेच्या निवडणूका औरंगाबादच्या नामकरणच्या मुद्यावरच गाजण्याची शक्यता वतर्वली जात आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर नाटक कंपनी म्हणत टीका केली होती. त्याला डॉ. गो-हे यांनी शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिले आहे.

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, पुण्याच्या नामकरणाचा विषय मुळात वादाचा नाही. नवीन इतिहास घडविणे जगजाहीर आहे. संभाजीनगर हा प्रस्ताव आधीच ठेवला आहे. उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. काही लोक यामध्ये तेढ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारले आहे. उपसभापती या नात्याने माझं मत मांडणार नाही. जिजामातांचे नाव पुण्याला देण्याची मागणी आहे. त्याबाबत सरकार विचार करेल. नामांतराच्या बाबतीत सरकार कटिबद्ध असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.