NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – NEET Exam Result | वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (Medical Course) दरवर्षी लाखो उमेदवार नीट परीक्षाला बसतात. नीट ही परीक्षा खूप कठीण असते. राज्यात नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या (Suicide) घटना घडल्या आहेत. अकोल्यात (Akola) दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेचा निकालात (NEET Exam Result) अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. रोहिणी विलास देशमुख Rohini Vilas Deshmukh (वय-22) असे मृत तरुणीचे नाव आहे. अकोला शहरातील मध्य भागातील मोर्णा नदीच्या पुलावरून (Morna River Bridge) उडी घेत रोहिणीने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

रोहिणीने यापुर्वी नीट परीक्षा (NEET Exam Result) दिली होती. मात्र तिला या परीक्षेत 350 च्या जवळपास गुण मिळाले होते. आता यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला 420 गुण मिळाले. रोहिणी खुल्या प्रवर्गातून येत असल्याने तिला 565 च्यावर गुणाची अपेक्षा होती. परंतु अपेक्षेप्रमाणे तिला गुण कमी मिळाले. त्यामुळे ती तणावात होती.

 

काल रात्री रोजच्याप्रमाणे तिने घरच्यांसोबत जेवण केलं. यानंतर सर्वजण झोपले.
आज पहाटे पाचच्या सुमारास झोपेतून उठून रोहिणी बाहेर पडली आणि तणावातून तिने टोकाचा निर्णय घेतला.
तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुंबाला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची जुने शहर पोलीस ठाण्यात (Old City Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- NEET Exam Result | scores lower than expected in neet exam young girl commit suicde in akola crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, शिवसेनेचे आक्रमक नेते भास्कर जाधवांविरोधात FIR

 

Wonder Drinks Mixture | रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी

 

Pune Police | 12 वर्षानंतर परदेशातून आलेली महिला सुखरुप घरी, पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी