तैमूर अली खानच्या लोकप्रियतेचा शेजाऱ्यांना त्रास ; थेट पोलिसांकडे केली तक्रार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरच्या मुलाच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या करीना आणि सैफ मागे राहिले असून त्यांच्या मुलाची चर्चा खुप रंगत आहे. त्यांचा मुलगा तैमुर हा सर्वाधिक लोकप्रिय ‘स्टारकिड’ म्हणून ओळखला जातो. या मुलाचा शेजारच्यांना नेमका काय त्रास असेल? या त्रासामागचे कारण काय असेल जेणेकरुन शेजारच्यांनी डायरेक्ट केली पोलिसांकडे तक्रार…. जाणून घेऊ सविस्तर

सध्या तैमुर खुप चर्चेत असल्यामुळे त्याचे वेगवेगळे फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी मिडिया सतत सैफ-करीनाच्या घराबाहेर फिरत असतात. कायम त्यांच्या घराबाहेर गर्दी असल्यामुळे सैफ-करीनाच्या शेजारच्यांना याचा खुप त्रास होत आहे. सततच्या गर्दीमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेजारच्यांना चक्क थेट पोलिसांनकडे तक्रार केल्याचे समजले जात आहे.

ही पोलिस तक्रार स्वतः सैफने केल्याचे समजले होते, मात्र एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मी अशी कोणतीच तक्रार पोलिसांकडे केली नाही. पोलिसांकडे तक्रार केल्यापासून सैफच्या घराबाहेर जरी मिडीयाची गर्दी नसली तरी मिडीया तैमुरचा पाठलाग करणे सोडणार नाही. व सोडलेही नाही.

वेगवेगळ्या माध्यमाचे प्रतिनिधी तैमुरसाठी मोठ्या संख्येने सैफ आणि करीनाच्या घराबाहेर सतत उभे असतात. याच्या या गर्दीमुळे शेजारील सोसायटीतील लोकांना त्रास होत आहे. व त्यांच्या शांततेचा भंग होत आहे. या त्रासालाच कंटाळून त्यांनी मिडीयाच्या प्रतिनिधीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनंतर पोलिसांनी सोसायटीत येऊन सर्व प्रतिनिधींना बाहेर काढले.