रिपोर्ट : चीनकडून लाच घेतायेत नेपाळचे PM ओली, स्विस अकाऊंटमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नेपाळच्या पंतप्रधानांवर चीनकडून कोट्यवधी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीनचे सरकार नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अनेक मिलियन डॉलर्सची लाच देत आहेत. ओली यांचे जिनेव्हा बँक खात्यात 41.34 कोटी रूपये जमा आहेत. चीन याच प्रकारे नेपाळच्या सरकारला भारत सरकारविरोधात भडकवण्याचे काम करत आहे.

चीन आपल्या शेजारच्या गरीब अर्थव्यवस्था असणार्‍या देशांच्या भ्रष्ट नेत्यांना आपल्याबाजूने वळवून भारताच्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. ग्लोबल वॉच अनालिसिसच्या नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टने याबाबत दावा केला आहे की, चीनने नेपाळमध्ये पीएम केपी शर्मा ओली यांच्या माध्यमातून आपले बस्तान बसावले आहे.

या रिपोर्टनुसार, ओली यांची संपत्ती मागील काही वर्षात अनेक पटींनी वाढली आहे. ओली यांनी अनेक देशांमध्ये सुद्धा संपत्ती खरेदी केली आहे. याच्या बदल्यात ओली यांनी चीनला नेपाळमध्ये आपला बिझनेस प्लॅन लागू करण्यासाठी मदत केली आहे. या प्लॅनमध्ये नेपाळमधील चीनच्या राजदूत होउ या मदत करत आहेत.

ग्लोबल वॉच अनालिसिसच्या रिपोर्टनुसार नेपाळचे पीएम ओली यांचे स्विझर्लंडच्या जिनेव्हा येथील मिरबॉड बँकेत सुद्धा अकाऊंट आहे. या खात्यात सुमारे 41.34 कोटी रूपये जमा आहेत. ओली यांनी ही रक्कम लॉन्ग टर्म डिपॉझिट आणि शेयरच्या रूपात जमा केली आहे.

या खात्यात पैसे ठेवल्याने त्यांची पत्नी राधिका शाक्य यांना दरवर्षी सुमारे 2 कोटी रूपयांचा लाभ मिळत आहे. ग्लोबल वॉच अनालिसिसनुसार ओली यांनी 2015-16 च्या आपल्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा कंबोडियाच्या टेलिफोन सेक्टरमध्ये सुद्धा खुप पैसे गुंतवले होते.

तेव्हा नेपाळमध्ये चीनचे राजदूत वू चुन्टाई यांनी ओली यांना खुप मदत केली होती. हा सौदा ओली यांचे निकटवर्तीय उदयोगपती अंग शेरिंग शेरपा यांनी करून दिला होता. सौद्यात कंबोडियाचे पंतप्रधान हूं सेन आणि चीनचे मुत्सद्दी बो जियांगेओ सुद्धा सहभागी होते.

ओली यांनी सरकार आणि अंतरराष्ट्रीय नियमांना धुडकावत डिसेंबर 2018 मध्ये डिजिटल अ‍ॅक्शन रूम बनवण्याची डील चीनची कंपनी हुवावेला दिली होती. मे 2019 मध्ये नेपाळ टेलीकम्युनिकेशनने हाँगकाँगच्या चीनी कंपनीसोबत रेडियो अ‍ॅक्सेस नेटवर्क तयार करण्याची डील केली होती.

यावर्षी चीनची कंपनी जेटीईसोबत 4जी नेटवर्क लावण्यासाठी सौदाही झाला. हे दोन्ही प्रोजेक्ट सुमारे 1107 कोटी रूपयांच्या खर्चाचे आहेत. ओली यांच्याद्वारे या कंपन्यांना काम देण्याच्या पद्धतीचा नेपाळ आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर खुप विरोध सुद्धा झाला होता.

एवढेच नव्हे, नेपाळने चीनकडून 621 कोटी रूपये खर्च करून कोरोनासाठी पीपीई किट आणि टेस्टींग यंत्रसुद्धा खरेदी केली होती. यातील बहुतांश खराब होती. सोबतच त्यांची किंमतही जास्त होती. याविरोधात नेपाळमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या प्रकरणात नेपाळचे आरोग्य मंत्री आणि ओली यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे.