हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही सूर्याइतकीच लख्ख : उर्मिला मातोंडकर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख आहे असल्याचे मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले आहे. कंगना रणौतने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला होता. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात 16 अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेले नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही. तर प्रत्येक क्षेत्रात आहे असल्याचे मातोंडकर यांनी सांगितले. त्या काळात सोशल मीडिया नव्हता.

नेपोटेझिमहा खूप काळापासून आहे. दरम्यान, सुशांत सिंंह राजपूतने आत्महत्या केली ही दुर्दैवी बाब आहे. मी त्यानंतर जे ट्विट केले होते त्यात पहिला शब्द नेपोटिझम होता. सुशांत चांगला अभिनेता होता. त्याच्या मृत्यूनंतर जो काही तमाशा केला जातो आहे तो दुर्दैवी आहे असेही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like