नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्स आता हिंदीमध्येही उपलब्ध होईल. नेटफ्लिक्स भारतात खूप लोकप्रिय होत आहे आणि हे लक्षात घेऊनच कंपनीने आता हिंदी यूजर इंटरफेस लाँच केला आहे.
नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, आता साइन अपपासून सर्च, दररोज, कलेक्शन आणि पेमेंटपर्यंतची माहिती हिंदीतच उपलब्ध होईल. हे मोबाइल, टीव्ही आणि वेब सारख्या सर्व डिव्हाइससाठी लागू असेल.
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, हिंदी भाषेचा सपोर्ट केवळ भारतासाठीच नाही तर इतर देशांमध्येही नेटफ्लिक्सच्या यूजर इंटरफेसमध्ये हिंदीचा पर्याय उपलब्ध असेल. आतापर्यंत नेटफ्लिक्समध्ये हिंदीचा सपोर्ट दिला गेला नव्हता.
नेटफ्लिक्स इंडियाच्या वाईस प्रेसिडंट मोनिका शेरगिल यांनी म्हटले आहे की, ‘एक उत्तम नेटफ्लिक्स अनुभव देणे आमच्यासाठी उत्तम कन्टेन्ट तयार करण्याइतकेच महत्वाचे आहे.’ आम्हाला आशा आहे की, नवीन यूजर इंटरफेस हिंदीला पसंती देणाऱ्या लोकांसाठी नेटफ्लिक्सला आणखीन एक्सेसिबल बनवेल.’
नेटफ्लिक्ससाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणूनच कंपनीने मागच्या वर्षी १९९ रुपयांचा मोबाइल प्लॅन लाँच केला होता. एवढेच नव्हे तर कंपनी येथे सिरीज आणि चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. २०१९ आणि २०२० मिळून कंपनी भारतात कन्टेन्टसाठी ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.
महत्वाचे म्हणजे नेटफ्लिक्सने १४ सीरिज रिलीज केल्या आहेत, तर आणखी १० सीरिजची घोषणा केली आहे. अलीकडेच नेटफ्लिक्सने १७ चित्रपट आणि सीरिज जाहीर केल्या आहेत, ज्या येत्या आठवड्यात प्रदर्शित होतील.