Netflix Top 10 : ‘नेटफ्लिक्स’वर इरफान खानच्या सिनेमांचा ‘हँगओव्हर’, टॉप-10 मध्ये 2 जबरदस्त सिनेमांचा समावेश !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं बुधवारी (दि. 29) जगाचा निरोप घेतला. 53 वर्षीय अभिनेता दीर्घकाळापासून कॅन्सरसोबत लढा देत होता. त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरू होते. 2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. यावर त्यावर त्यानं उपचारही घेतले होते. त्याच्या निधनानंतर जगभर शोक व्यक्त करण्यात आला. फॅन्स इरफानची एवढी आठवण काढताना दिसत आहेत की, नेटफ्लिक्सवर भारतात पाहिल्या जाणाऱ्या कंटेटमध्ये आता इरफानच्या दोन जबरदस्त सिनेमांचा समावेश आहे.

टॉप-10 मध्ये इरफान

नेटफ्लिक्सवर पाहिल्या जाणाऱ्या टॉप 10 च्या यादीत इरफान खानच्या ज्या दोन सिनेमांचा समावेश आहे त्यापैकी एक आहे तो म्हणजे 2013 साली आलेला लंच बॉक्स हा सिनेमा. रितेश बत्रा डायरेक्टेड या सिनेमाला ब्रिटीश अॅकेडमी अवॉर्डचे 3 नॉमिनेसन आहे. हा सिनेमा 8व्या नंबरवर आहे. दुसरा सिनेमा आहे पान सिंह तोमर. यासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. हा 2012 साली आलेला सिनेमा असून हा 10 व्या नंबरवर आहे.

नेटफ्लिक्स टॉप 10 पुढीलप्रमाणे-

1) मिसेस सिरियल किलर
2) नेव्हर आय हॅव एव्हर
3) लव आज कल
4) एक्सट्रॅक्शन
5) मनी हाएस्ट
6) द लिफ्ट बॉय
7) टू हॉट टू हँडल
8) द लंच बॉक्स ़
9) इंटू द नाईट
10) पान सिंह तोमर