home page top 1

‘हे’ पदार्थ खाल्ल्यास रात्रभर येणार नाही झोप !

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नये. असे केल्याने चांगली झोप लागत नाही. कुस बदलण्यातच वेळ जावू जाऊन झोपेचे खोबरे होऊ शकते. परंतु, असे का होते याबाबत आपण कधीच विचार करत नाही. रात्रीच्या जेवणात चूकीचे पदार्थ घेतल्यास त्याचा झोपेवर वाईट परिणाम होऊन रात्र जागून काढावी लागते. असे वारंवार होत असल्यास आपल्या खाण्याच्या काही सवयींमध्ये बदल केला पाहिजे. रात्री शांत झोप लागेल असे पदार्थ सेवन केले पाहिजेत.

कॅफिनचे जास्त प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन रात्री झोपताना केल्यास त्याचा परिणाम मेंदूवर होऊन झोप लागत नाही. कॅफिनच प्रभाव सुमारे ५ तासापर्यंत राहतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कॅफिन घेणे नेहमी टाळावे. जंक फूडच्या खाल्ल्यानेही झोप लवकर लागत नाही. जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. ते पचण्यास जड असते. यामुळे रात्रीच्या वेळी जंक फूडचे सेवन केल्यास झोप लागत नाही.

तिखटच जेवण अनेकांना आवडते. मात्र, रात्री जास्त तिखट जेवण केल्यास त्याचा झोपेवर परिणाम होतो. छातीत जळजळ आणि पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच मांस सेवन केल्यानेही झोप व्यवस्थित लागत नाही. मांस मध्ये जास्त फॅट आणि प्रोटीन असते आणि हे पचायलाही खूप वेळ लागतो. यामुळे रात्री मांस सेन केल्यास झोप लागत नाही.

Loading...
You might also like