‘WhatsApp’मध्ये आले नवीन फिचर, ‘स्टेटस अपडेट’ करणाऱ्यांना होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चालू वर्षाच्या सुरूवातीस, फेसबुक कंपनीने त्यांच्या ब्रँडिंग अंतर्गत तीन अ‍ॅप्स – फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपला एकत्रित करण्यासाठी व्हिजन मांडले होते आणि आता त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. नवीन सेटिंग्जनुसार अँड्रॉइड वापरकर्ते आता त्यांची व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट फेसबुक स्टोरीजमध्ये थेट शेअर करू शकतात.

फेसबुक स्टोरीजमध्ये इन्स्टाग्रामच्या गोष्टी शेअर करण्याचा पर्याय आधीच उपलब्ध आहे आणि आता व्हॉट्सअ‍ॅपचे नावही या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. यावर्षी जूनमध्ये, प्रायोगिक तत्वावर निवडक वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा प्रोग्रामअंतर्गत या वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले होते आणि आता हे वैशिष्ट्य अखेरीस व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीनतम आवृत्तीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

अशा प्रकारे फेसबुक स्टोरीज मध्ये Whatsapp स्टेटस शेअर करा :

– ‘My Status’ वर जा

– आपण Facebook वर शेअर करू इच्छित असलेल्या स्टेटस पुढील ‘हॅम्बर्गर’ चिन्हावर क्लिक करा

– येथे जा आणि ‘Share to facebook’ वर क्लिक करा

– येथे आपण डीफॉल्ट प्रायव्हसी सेटिंग्जसह आपले फेसबुक प्रोफाइल पिक्चर पहाल.

– स्टेटस शेअर करण्यापूर्वी येथून पब्लिक, फ्रेंड्स आणि कनेक्शन, फ्रेंड्स, कस्टम किंवा हाईड स्टोरी मधील प्रायव्हसी पर्याय निवडा.

– आता स्टोरी शेअर करण्यासाठी ‘Shere Now ‘ वर क्लिक करा.

एकदा फेसबुक स्टोरी म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस पोस्ट केले की ते २४ तास राहील. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अनेकदा फेसबुक स्टोरी म्हणून शेअर केले जाऊ शकते. यामध्ये आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की मूळ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस हटविल्यानंतरही फेसबुक स्टेटस मात्र कायम राहील.