New Labour Code | 3 दिवसाची सुट्टी आणि कमी सॅलरीच्या कायद्यावर मंत्र्यांचे मोठे वक्तव्य, कुणाला होणार फायदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – New Labour Code | केंद्र सरकार नवीन कामगार संहिता (Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याची पूर्ण अंमलबजावणी कधी होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. नवीन लेबर कोड लागू करण्यामागे सरकारची काय भूमिका आहे हे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी नुकतेच सांगितले. नव्या लेबर कोडच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले. यासोबतच उत्तम भांडवल निर्मिती आणि कौशल्य विकास होईल. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढीसोबतच कामगारांच्या कल्याणासाठीही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. (New Labour Code)

 

ऑक्यूपेशनल सेफ्टी आणि वेज स्टँडर्ड
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात भूपेंद्र यादव म्हणाले- नवीन लेबर कोडचा उद्देश खटलामुक्त समाज निर्माण करणे आहे. अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना सक्षम बनवायचे आहे. तसेच विनाकारण गुन्हेगारीकरण होता कामा नये. आम्ही जुना कायदा तर्कसंगत केला आहे. तसेच पुरुष आणि महिला दोघांनाही न्याय्य वेतन सुनिश्चित करण्यासाठी ऑक्यूपेशनल सेफ्टी आणि वेज स्टँडर्डचा विचार केला आहे. ते म्हणाले की 29 विविध कायद्यांचे चार नवीन कामगार संहितांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. (New Labour Code)

 

चार नवीन कोड
नवीन लेबर वेज कोड (Wage), सोशल सिक्युरिटी (Social Security), इंडस्ट्रीयल रिलेशन्स (Industrial Relations) आणि ऑक्युपेशनल सेफ्टी (Occupational Safety) यांच्याशी संबंधित आहे. भूपेंद्र यादव म्हणाले की, नवीन लेबर कोड अंतर्गत ऑक्युपेशनल सेफ्टी लागू करण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत.

 

नवीन वातावरण तयार होईल
त्यांनी म्हटले की, नवीन लेबर कोडमध्ये सोशल सिक्युरिटी फंडची तरतूद आहे. फौजदारी तरतुदी असलेले कायदे 1,500 वरून कमी करून फक्त 22 इंडस्ट्रियल रिलेशन कोडमध्ये समावेश केला आहे. यामुळे, कामगार आणि मालक दोघांसाठी योग्य नवीन वातावरण तयार होईल.

28 कोटी कामगारांनी केली नोंदणी
ते म्हणाले, नवीन लेबर कोड संघटित आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करतो. असंघटित कामगारांच्या नोंदणीचीही तरतूद आहे. 7 महिन्यांत 28 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांनी 4 लाख सामायिक सेवा केंद्रांद्वारे ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे.

 

यादव म्हणाले, आम्ही सर्व कामगारांना विमा संरक्षणही दिले आहे. मी कामगार संघटनांनाही सांगतो की आमचे सरकार कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. सर्व संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.

 

1 जुलैपासून नवीन लेबर कोड लागू करण्याची चर्चा होती, परंतु सर्व राज्यांना संहितेचा मसुदा तयार करता आला नाही. त्यामुळे नवीन लेबर कोड लागू होऊ शकलेला नाही. संपूर्ण देशात याची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

3 दिवस साप्ताहिक सुट्टीची तरतूद
नव्या लेबर कोडनुसार नोकरदारांना चार दिवस काम आणि आठवड्यातून तीन सुट्टी मिळू शकते.
नवीन वेज कोडमध्ये मूळ वेतनातही बदल केला आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर, टेक होम सॅलरी म्हणजेच इन हॅन्ड सॅलरी कमी होईल.

 

इन हँड सॅलरी कमी
सरकारने पे रोलबाबत नवीन नियम केले आहेत.
नवीन वेतन संहितेनुसार, कर्मचार्‍याचा मूळ पगार (Basic Salary) त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) 50 टक्के किंवा त्याहून जास्त असावा.
आता जर तुमचा मूळ पगार वाढला तर तुमचे पीएफ फंडातील योगदानही वाढेल.
अशावेळी पीएफमध्ये पूर्वीपेक्षा जास्त पैसे जमा होतील. त्यामुळे कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळेल.

 

Web Title :- New Labour Code | new labour codes aim to create litigation free society and empower common citizens says union minister bhupender yadav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

 

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

 

Dhananjay Munde | CM शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला