WhatsApp न उघडताच तुम्ही ‘या’ पद्धतीने ‘व्हॉईस’ Messages ऐकू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवीन फिचर आणणार आहे. ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅप खोलण्याची देखील गरज पडणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये वॉयस नोट प्रीव्यू आणण्याची तयारी करत आहे. यामध्ये एका वेबसाईटने याविषयी माहिती देतानाच हे फिचर कशाप्रकारे काम करेल याचा फोटोदेखील शेयर केला आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमचे व्हाट्सअ‍ॅप न उघडताच हि व्हॉइस नोट उघडून तुम्हाला आलेला मॅसेज ऐकू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार हे फिचर सध्या iOS युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले, असून लवकरच ते अँड्रॉइड व्हर्जनमध्ये देखील देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्याचबरोबर युजर तो मॅसेज तिथेच वाचून त्याचे उत्तर देखील देऊ शकतो.

लवकरच मिळणार आहेत नवीन फीचर्स
व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता लवकरच नवीन फीचर्स येणार आहेत. यामुळे आता तुमचे व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामधील अनेक फीचर्सचा युजर्स मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यामध्ये डार्क मोड, क्विक एडिट, स्टेटस म्यूट यांसारख्या नवीन फीचर्सचा समावेश आहे. यूज़र्सच्या मागणीमुळे कंपनी या फीचर्सवर काम करत असून लवकरच हे फीचर्स तुम्हाला वापरायला मिळणार आहेत.

१) डार्क मोड
२)क्विक एडिट मीडिया शॉर्टकट
३)पेमेंट फीचर
४)QR Code स्कैनर
५)हाइड म्यूट स्टेटस

 

You might also like