Coronavirus : Vitamin-C होऊ शकतं का ‘कोरोना’वर असरदार ? डॉक्टरांना मिळाले ‘हे’ संकेत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. आतापर्यंत 19 हजार लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. विविध देशात कोरोनावर उपचार शोधले जात आहेत. अशात आता एका प्रयोगात अमेरिकेत कोरोना व्हायरसग्रस्तांना विटामिन सी देण्यात येत होते ज्याचा सकारात्मक परिणाम समोर आला. वृत्तानुसार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी यातून मदत मिळेल.

या नव्या परिक्षणावर विशेषज्ञ डॉ. एंड्रयू जी वेबर म्हणाले, कोरोनाग्रस्ताना 1,500 मिलीग्राम इंट्रावेनस विटामिन सी देण्यात आले होते.

संक्रमित रुग्णांना जी औषधे देण्यात येत आहे ती डब्ल्यूएचओने ठरवून दिलेल्या विटामिन सीच्या दैनंदिन डोसपेक्षा 16 पट अधिक आहे. वृद्ध पुरुषांसाठी फक्त 90 मिलीग्राम आणि वृद्ध महिलांसाठी 75 मिलीग्राम निर्धारित केले आहे.

वेबर म्हणाले, या प्रयोगाचा परिणाम चीनच्या शंघाईमधील कोरोगाग्रस्तांवर करण्यात आलेल्या उपचारांवर आधारित आहे. ते म्हणाले, ज्या रोगींना विटामिन सी देण्यात आले, ते त्या लोकांच्या तुलनेत बरेच निरोगी आहेत ज्यांना विटामिन सी देण्यात आले नव्हते.

डॉक्टर वेबर म्हणाले, मोठ्या प्रमाणात विटामिन सीचा ठोस कोरोनाशी लढण्यास मदत करतो परंतु त्याला पूर्णपणे घालवू शकत नाही. कारण कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नाही.

कोरोना व्हायरसवर विटामिन सी च्या प्रभावशीलतेचे एक परिक्षण 14 फेब्रुवारीला वुहानच्या झोंगशाल रुग्णालयात महामारी उपचार केंद्रात केले गेले होते.