वाहतूक उपायुक्तपदी ढाकणे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नव्याने सुरू झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयच्या वाहतूक शाखा उपायुक्तपदी मुख्यालय उपायुक्त विनायक ढाकणे यांची नेमणूक केली आहे. तर काल केलेल्या गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या बदल्यात फेरबदल करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4adb64d3-c0d1-11e8-bdc6-534e54d09d7e’]

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन (उपायुक्त) एकचा पदभार स्मार्तना पाटील, झोन दोनचा पदभार नम्रता पाटील आणि मुख्यालय उपायुक्त म्हणून विनायक ढाकणे यांची त्यावेळी नियुक्ती करण्यात आलेली होती. तर वाहतूकचा कारभार अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे पाहतील असे सांगण्यात आली होती. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकडे पोलीस आयुक्तांनी प्रामुख्याने लक्ष दिले आहे. दरम्यान वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदी मुख्यालयाचे उपायुक्त विनायक ढाकणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

विनयभंग प्रकरण : ‘त्या’ सहायक पोलीस निरीक्षकाला (API) नियंत्रण कक्षाशी केले संलग्न

काल झालेल्या आयुक्‍तालयाच्या गुन्हे शाखेच्या बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांच्याकडे युनिट एक ऐवजी युनिट दोन तर निरीक्षक यु.व्ही. तांगडे यांच्याकडे युनिट दोन ऐवजी युनिट एकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन आणि अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे यांनी नियुक्‍तीचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपुर्वी पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांनी चाकण पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुनिल पवार यांची नियुक्‍ती केली होती तर आळंदी आणि चाकण वाहतुक शाखेत देखील पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (सोमवारी) पोलिस निरीक्षक सुधाकर काटे आणि निरीक्षक यु.व्ही. तांगडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.