Photos : आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसला ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा ‘ग्लॅमरस’ लुक !

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव असते. गेल्या काही दिवसांपासून सपना आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत येताना दिसत आहे.

लग्न करण्यापासून तर ते आई बनण्यापर्यंत सर्व काही सपनानं सिक्रेट ठेवलं होतं. करवा चौथच्या दिवशी तिनं पतीसोबतचा पहिला फोटो शेअर केला होता. यानंतर आता सपनानं आई झाल्यानंतरचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात सपना खूप फिट दिसत आहे. सपनाचे हा लुकही चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या तिचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

सपनाच्या या लुकमध्ये सर्वांत जास्त काय हायलाईट होत असेल तर ते म्हणजे तिची turquoise मेटलिक लिपस्टिक आणि ग्लिटरी व्हाईट आयलायनर. दोन्ही गोष्टींनी सपनाच्या लुकला चार चांद लागले आहेत. तिचा लुक खूपच युनिक दिसत आहे. तिची स्टाईलही पाहण्यासारखी आहे.

4 ऑक्टोबर रोजी सपनानं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारीत बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत सिक्रेट मॅरेज केलं होतं. सपना चौधरीची लोकप्रियता गगनाला भिडली. ती अनेक लक्जरी गाड्यांची मालकीन आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.