#VotingRound3 : मतदानादरम्यान जामखेडमध्ये पैसे वाटपाचा प्रकार

पहिल्या टप्प्यात ७.३७ टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात ७.३७ टक्के मतदान झाले. जामखेड मध्ये पैशाचे वाटप केल्याच्या संशयावरून एकास पकडण्यात आले आहे. इतरत्र कोणताही गैरप्रकार न करता शांततेत मतदान सुरू आहे. जामखेड येथेच एका यंत्रात काही काळ बिघाड झाला होता. तेथे सव्वानऊ वाजता मतदानास सुरूवात झाली.

राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी सकाळीच मतदान केले. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी सकाळी विशाल गणपतीचे दर्शन घेऊन मतदान केंद्राला भेटी दिल्या. विखे यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात नाव आहे. त्यामुळे त्यांना आज मतदान करता आले नाही. शिर्डी मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

ऊन्हाचा कडाका सुरू होण्याआधीच अनेक मतदान केंद्रावर सकाळीच रांगा दिसून आल्या. सखी मतदान केद्रावर महिलांनी रांगोळ्या काढून केंद्राभोवती सजावट केली. ग्रामीण भागातही ज्येष्ठांनी सकाळीच मतदान केले. शहरातही सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर अनेक केंद्रावर मतदान केले. नगर लोकसभा मतदार संघासाठी २०३० मतदान बुथवर तब्बल १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.