‘तो’ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पैसे घेतानाच्या ‘व्हायरल व्हिडिओ’ मुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सांगळे हे वाहतूक शाखेत असताना त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन सांगळे याची सखोल चौकशी केली त्यानंतर नंदकुमार सांगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली काल रात्री उशिरा हा आदेश बजाविण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पदभार स्वीकारल्यापासून पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली आहे. गैरप्रकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकाऱ्यांबाबत तक्रारी होतात, त्यांच्यावरही कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलातील भ्रष्ट पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

You might also like