भोकर पोलिसांकडून जनतेची फसवणूक होत असल्याची चर्चा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात अवैध धंदे जोमात सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे. अवैध धंदे, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक जोमात चालू आहेत, लोकप्रिय दैनिकात अशा बातम्या प्रसारित होत असताना भोकर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बॅनर लावून जनतेला २००० रु बक्षीस देण्याचे आव्हान करून जनतेची फसवणूक करत आहेत काय? अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

भोकर शहरात आंबेडकर चौक मध्ये म्हणजे पोलीस स्टेशनच्या १००मी अंतरावर मटका, गुटखाचे व्यवहार मोठ्या तेजीत चालतात. हे सर्व पोलीस प्रशासनाला माहीत असून देखील कार्यवाही न करता मोठ्या प्रमाणात चिरीमिरी करून व्यवसाय सुरू आहेत का?अशी सुद्धा चर्चा सुरू आहे.

शहरात मटका कोण चालवतो व गुटखाचे किरकोळ व ठोक व्यापारी कोण हे पोलीस प्रशासन माहीत नाही का? त्यांनी जनतेला प्रश्न करून आमिष दाखवत असल्याचे जाहीर आवाहन फलक काढले आहे त्याबद्दल चर्चा होत आहे. त्या फलकावर कोणाला संपर्क करावा, त्यासाठी वेगळं असे लोक नियुक्त केले नसावे म्हणून संपर्क भोकर पोलीस स्टेशन मध्ये करावा असे फलकावर दिसून आले आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याचा विश्वास पोलीस निरीक्षक भोकर तर्फे देण्यात आला आहे. ह्या बद्दल पोलीस स्टेशन व्यतिरिक्त कुठही बॅनर लावले नाही असं देखील निदर्शनास आले आहे. नेमकं पोलीस प्रशासन कोणत्या लोकांच्यासाठी हे आवाहन केले आहे हे मात्र अजून कळले नाही. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी आलेल्या लोकांसाठी की धरून आणलेल्या गुन्हेगारा पुरते हे आव्हान आहे का हेच बॅनर शहराच्या मुख्य चौक, रहदारी असलेल्या ठिकाणी असले असते तर शहरात अवैध धंदे करणाऱ्याचे डोके वर निघाले नसते.

दि. १९ रोजी तरुण भारत या लोकप्रिय दैनिकात शासकीय विश्रामगृहा समोर मटका खुले आम चालू आहे अशी बातमी प्रकाशित झाली. त्यावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली का नाही? अशी चर्चा शहरात असताना पोलीस कामाला लागली आहे का झोपेचे सोंग घेत आहे हे अद्यापपर्यंत जनतेला कळले नाही. दोन वर्षांपूर्वी संदीपान शेळके हे भोकर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रश्न विचारला असता पत्रकाराना अस सांगितले की, मी केवळ ९०%बंद करणार १०%बंद नाही करणार ते माझ्याने बंद होणार नाहीत असे बोलले होते. त्यानंतर भोकर शहरात अजून देखील अवैध धंदे बंद न झाल्याची चर्चा सुरू आहे. अशा जुन्या आठवणींच्या चर्चा देखील जनतेच्या मनात भोकर पोलिसांनी लावलेल्या आवाहन प्रसिध्द केलेल्या पोलीस निरीक्षक यांच्या बॅनरहून होत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –