तुमच्या मुलाला ‘हा’ आजार तर नाहीना ? असेल तर वेळेत करा उपचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या घरात दंगा, मस्ती, आरडाओरडा झाला की समजा तिथे लहान मुले आहे. अशी मुले दंगा मस्ती करताना छान वाटतात. पण काही वेळा लहान मुले आपण कितीही त्यांच्यासाेबत खेळलो तरीही काहीच प्रतिक्रिया देत नाही. किंवा त्यांच्या चेहऱ्यावर काेणतेच हावभाव दिसत नाही. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांना खुप टेन्शन येते. हा लहान मुलांना होणारा आजार म्हणजेच ‘ऑटिज्म’ काय आहे हे ? सविस्तर पणे जाणून घेऊया…

मुले जेव्हा लहान असतात शारिरीक दृष्ट्या काही वैगुण्य नसतात. पण त्यांचे बाेलणे कमी, त्यांना स्पर्श नकाेसा वाटणे, चिडचिड करणे, उगीचच रडणे अशी लक्षणं दिसली की अनेकदा पालक आपलं बाळ हट्टी आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. स्वमग्न बालकात शारीरिक व्यंग नसल्याने या मुलांच्या बोलण्या-वागण्यातूनच पालकांना या आजाराची लक्षणे ओळखावी लागतात. त्यामुळे अनेकदा आजार उशिरा लक्षात येतो आणि तेव्हा नाइलाजाने आपल्या मुलांना मतिमंद बालकांच्या शाळेत दाखल करावे लागते.

अनेकदा तुम्ही अशा मुलांना पाहिलं असेल जे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकल्यावर ना आनंदी होत ना हसत ना कोणतीही प्रतिक्रिया देत. कुणाच्याही चेहऱ्याचे हावभाव पाहून ही मुले काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. अशी मुलं-मुली इतरांच्या तुलनेत फार शांत आणि गप्प राहतात. ते त्यांच्याच विश्वात हरवलेली असतात. असे मुलं-मुली ऑटिज्मने ग्रस्त असतात.

लहान मुलांना आपले बोलणे एकू जाते की नाही, किंवा त्यांचे डोळे आपल्याकडे बघत नाहीत. नजरेला नजर देत नाहीत. त्यांच्याकडून शाब्दिक प्रतिसाद फार क्वचित मिळतो. त्यामुळे कित्येकदा या मुलांना मतिमंद समजले जाते. पण यापैकी बरीचशी मुलं ही मतिमंद नसतात. या मुलांना तात्पुरत्या स्वरूपाचे संबंध वा व्यवहार जमत नाहीत.

ऑटिज्म सामान्य शब्दात सांगायचं तर हा एक मानसिक आजार आहे. लहान मुलांमध्ये याची लक्षणे त्यांच्या जन्माच्या तीन-चार महिन्यांनंतर ते तीन वर्षांचे होईपर्यंत बघायला मिळतात. जी मुले ऑटिज्मने पीडित असतात, त्यांच्यातील लक्षणे वेगवेगळी बघायला मिळू शकतात. ऑटिज्म झाल्यावर लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्णपणे रखडतो. वेळीच ही लक्षणे ओळखून त्यांच्यावर उपचार सुरु व्हायला हवेत. तज्ज्ञांनुसार, अनेकदा गर्भावस्थेदरम्यान आहार योग्य नसल्याने लहान मुलांना ऑटिज्मचा धोका होऊ शकतो.

ते फक्त स्वतःच्या आईच्या भावना समजू शकतात
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, ऑटिज्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ने ग्रस्त लहान मुलं इतके आत्मकेंद्री असतात की, ते दुसऱ्यांच्या भावना समजू शकत नाहीत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ऑटिज्मने पीडित मुलं-मुली त्यांच्या आईच्या भावनांना आणि चेहऱ्याच्या हावभावांना समजू शकतात जसे सामान्य मुलं-मुली समजतात.

विकास होणे थांबते
या आजारामुळे पीडित लहान मुलांचा विकास इतरांच्या तुलनेत हळूहळू होतो. कारण यात त्यांचा मानसिक विकास योग्य होत नाही. अशी मुले इतर मुलांमध्ये जाण्यास घाबरतात. ते प्रतिक्रिया द्यायला सुद्धा फार जास्त वेळ घेतात आणि काहींमध्ये हा आजार भीतीच्या रूपात बघायला मिळतो.

ऑटिज्मची लक्षणे
१) या आजाराने लहान मुलं-मुली आजूबाजूच्या लोकांना काहीच प्रतिक्रिया देत नाहीत.
२) आवाज ऐकल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नसतात.
३) त्यांच्यामध्ये भाषेसंबंधी समस्याही बघायला मिळतात.
४) अशी मुलं स्वत:च्या विश्वात हरवलेली असतात.
8) कोणताही त्रास त्यांना असाहाय्य होतो व ही मुलं आऊट ऑफ कंट्रोल होतात.

मुलांसाठी उपचार
१ ) स्वमग्न मुलांना नुसतेच शाळेत घालून नसून वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करावा लागतो.
२ ) विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना          शिकवणे गरजेचे आहे. .
३) त्यांना वैयक्तिक कौशल्ये, सूक्ष्मकारक कौशल्ये, संगीत उपचार पद्धती, एस.आय. पद्धती, चित्रकला पद्धती, भाषाविकास                 पद्धती, शैक्षणिक विकास पद्धती विविध आणि कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना                         व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासाठी होतो.
४) आठवड्यातून दोन दिवस संगीत उपचार पद्धती, दोन दिवस ऑक्युपेशनल थेरपी, दोन दिवस स्पीच थेरपी, तसेच वर्तन                   समस्यांवर वन टू वन रेशिओमध्ये काम करून मुलांना प्रशिक्षित करणे अनिवार्य बनते.
५ ) अशा मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी वर्कशॉप आयोजित करणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे
ऑटिस्टिक मुलांना व्होकेशनल शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणेही गरजेचे आहे. यांची                      बालकांची काळजी घेणारी अशा प्रकारची सेंटर्स उभी राहिली तर स्वमग्न मुलांना आपले हक्काचे आभाळ शोधता येईल.