तालुक्यात पुन्हा अराजक माजविण्यासाठीच विरोधकांना सत्ता हवीय, कुलांना संपविण्याची भाषा त्याचेच प्रतीक : माऊली ताकवणे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन ( अब्बास शेख ) – दौंड तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि भाईगिरी कुणी जोपासली. सर्वसामान्य जनतेला कुणी वेठीस धरले, कुणाच्या काळात तालुक्यात अराजक माजले होते हे सर्वांना माहीत असून विरोधकांना तालुक्यात पुन्हा अराजक माजविण्यासाठी सत्ता हवीय आणि त्यासाठी त्यांना कुल अडचण ठरतायत अशी टिका माऊली ताकवणे यांनी केली आहे.

दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरीने डोके वर काढले होते यातूनच अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. कुठे गोळीबार तर कुठे घरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत होते तालुक्यात ही परिस्थिती कुणामुळे झाली होती हे जनतेला चांगले माहीत असून आ.राहुल कुल यांच्या काळामध्ये या सर्व गोष्टींना आळा बसविण्यात यश आले आहे.

तालुक्यातील गुंडगिरी, भाईगिरी संपविण्याचे काम राहुल कुल यांनी केल्यानेच आता त्यांना संपविण्याची भाषा विरोधक करत आहेत मात्र जनता सुज्ञ असून त्यांना चांगले माहीत आहे की तालुका कोण व्यवस्थित चालवू शकतो त्यामुळेच तालुक्याने कुल कुटुंबियांवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवून त्यांच्याकडे तालुक्याची सूत्रे दिली आहेत आणि यापुढेही देतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like