पोलीस कर्मचारीच देतोय युवकांना गुन्हेगारीचे धडे, लँडमाफिया, वाळूमाफियांसोबतच्या सेटिंगमधून लाखो रुपयांवर डल्ला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – राज्यामध्ये गुन्हेगारी कमी व्हावी, युवकांनी गुन्हेगारी जगत सोडून सरळमार्गी जीवन जगावे यासाठी पोलीस यंत्रणा कार्य करत असल्याचे आपण दररोज ऐकत असतो. परंतु युवकांना गुन्हेगारीकडे आकर्षित करून त्यांनी गुन्हे कसे करावेत आणि त्यातून सुखरूप कसे सुटावे याचे धडे जर एक पोलीस कर्मचारीच युवकांना देत असेल तर ही क्षुल्लक वाटणारी बाब भविष्यामध्ये गंभीर समस्या बनली तर नवल वाटायला नको.

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये असाच काहीसा प्रकार घडत असून पेशाने पोलीस असणारा असाच एक शहरातील पोलीस कर्मचारी सध्या या ग्रामीण भागातील युवकांना गुन्हेगारीचे धडे देत असल्याचे समोर येत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने सध्या वाळू माफिया, लँडमाफियांसोबत आपले बस्तान बसवले असून तो आर्म ऍक्ट आणि विविध प्रकारचे गंभीर, अतिशय गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना आलिशान गाड्यांमधून या परिसरामध्ये फिरवून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्याचा धाक बसविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे.

गुन्हेगारी क्षेत्रामध्ये नविनच पदार्पण केलेल्या युवकांना तो गुन्हे कसे करावेत, त्यातून सहीसलामत कसे सुटावे आणि या गोष्टीचा धाक आपल्या परिसरामध्ये कसा बसवावा याचे धडे देत असल्याची गंभीर बाब नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे. एकीकडे गुन्हेगारांनी गुन्हेगारी जगत सोडून मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणा कार्यकरत असताना अश्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे मात्र पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली जात आहे. त्यामुळे वेळीच अश्या महाभागांवर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यामध्ये याची मोठी किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागेल यात शंका नाही.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा