दौंडमधील लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दौंडमधील वायरलेस फाटा येथील एक बड्या लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायावर बारामती गुन्हे शाखेची पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून एकास अटक ३ मुलींची सुटका केली. चंद्रशेखर सुंदर शेट्टी (रा. दौंड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगार व आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील अवैध्य धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात अवैध्य धंदे जोमात सुरू आहेत. दरम्यान

दौंडमधील वायरलेस फाटा येथील एक लॉजवर वेश्याव्यवसायावर सुरु असल्याची माहिती बारामती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार बारामती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकातील पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे पो.कॉ. विशाल जावळे पो.कॉ. शर्मा पवार यांनी लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. येथून ३ मुलींची सुटका करत एकाला ताब्यात घेतले. सुटका केलेल्या मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com