धुळे बस आगारात चालक, वाहक, यंत्रकामगारांचा सत्कार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सालाबादा प्रमाणे आज शनिवारी धुळे बस स्थानकातील डेपो मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गंगाथर डी. यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, आगार व्यवस्थापक भगवान जगनोर, सरीता पाटील, कामगार अधिकारी एन. डी. चित्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सप्ताह 11 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यत राबविण्यात येणार आहे. यावेळी चालक, वाहक, मेकॅनिक यांचा जिल्हाधिकारी गंगाथर डी. यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन चांगले कार्य करत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

वाहन चालवताना लक्ष रस्त्यावरच असले पाहिजे. मोबाईल व व्यसनापासून दुर राहिले पाहिजे. रस्त्यावरील लक्ष विचलीत झाले तर मोठे नुकसान होते. याकडे चालकांनी लक्ष देणे गरजचे आहे. योगा, व्यायाम करुन आरोग्य चांगले राखा. आपण चांगली सेवा देत आहात पुढे हिच सेवा अविरत पणे सुरु ठेवा. वाहतूक नियमांचे पालन करा. अपघात टाळा. गाडी चालवताना मोबाईल कडे लक्ष देऊ नका. सिग्नलकडे लक्ष ठेवा. असा सल्ला जिल्हाधिकारी गंगाथर डी. यांनी उपस्थितांना दिला.

या सप्ताहाअतंर्गत वाहतुक नियम व वेगावर नियंत्रण, चालक व वाहक आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी, जनजागृतीवर विविध कार्यक्रम घेण्यात येतील, अशी माहिती विभानियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली.

कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन विभाचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेंद्र भावसार यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/