नगरची जागा भाजपला मिळावी, आमचा शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवाराला विरोधच : माजी खा. गांधी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास पाहता नगरची जागा भाजपला मिळावी, आता भावनात्मक आणि द्वेषाचे राजकारण नकोय, नगरकरांना विकास हवा आहे, कंपन्या बंद पडल्या आहेत, त्या उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यामुळे नगरची जागा भाजपला मिळावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी दिलीप गांधी म्हणाले की, युती झाली तर मागील पंचवीस वर्ष ज्यांना उमेदवारी दिली त्यांना आमचा विरोध राहणार. आम्हाला माजी आमदार अनिल राठोड चालणार नाही. त्यांना आम्ही चालत नसेल तर आम्हाला पण ते चालणार नाही. लोकसभेला मित्र पक्ष म्हणून आमच्यावर आरोप करत होते. आता आम्हाला पण ते नको आहेत.

गांधी पुढे म्हणाले की, महापालिकेत देखील भाजपची सत्ता असून नुकत्याच झालेल्या लोकसभेत भाजपला शहरातून मोठे मतधिक्य मिळाले होते. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल असा विश्वास दिलीप गांधी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like