पुण्यापाठोपाठ पिंपरीमध्ये फॉर्च्युनर चोरटे सक्रीय

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील श्रींमतांच्या फॉर्च्युनर गाड्या चोरण्याचा सपाटा लावलेल्या फॉर्च्युनर चोरट्यांनी आपला मोर्चा पिंपरी चिंचवडकडे वळविला असून निगडी प्राधिकरणातून एक फॉर्च्युनर गाडी चोरीला गेली आहे.

पुणे शहरातील भाजपचे नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर ही आलिशान गाडी चोरट्यांनी जानेवारी २०१९ मध्ये चोरुन नेली होती. त्यानंतर काही दिवसांनी शहरात एकाच रात्रीत तीन फॉर्च्युनर गाड्या चोरट्यांनी लांबविल्या होत्या. या सर्व गाड्या रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. तर त्यातील एका सोसायटीच्या दारातून चोरण्यात आली होती.

फॉरच्युनर चोरट्यांनी आता निगडी प्राधिकणात आपला हात दाखविला आहे. याप्रकरणी नेल्वीन पारमटटम वर्गीस (वय ४४, रा. सेक्टर नंबर २६, निगडी प्राधिकरण) या व्यवसायिकांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी ८ जुलैला रात्री साडेदहा वाजता आपल्या घराच्या बाहेर १२ लाख रुपयांची फॉर्च्युनर गाडी सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर रात्री चोरट्यांनी ही गाडी चोरुन नेली. पहाटे अडीच वाजता आपली गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजवर ज्या फॉर्च्युनर गाड्या चोरीला गेल्या. त्या अत्याधुनिक होत्या. चोरट्यांनी गाडी खालील भागात असलेली इलेक्ट्रॉनिक प्लेट काढून घेऊन ते तेथे आपल्याकडील प्लेट लावत. त्यामुळे त्यांना ही गाडी उघडणे व चालू करणे शक्य होते. त्यानंतर ती गाडी चोरुन नेतात. चोरलेल्या गाड्या या प्रामुख्याने राजस्थानमध्ये चोरट्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा