नेहमी गरम पाणी पिल्याने शरीरात होतात ‘हे’ 9 बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाणी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे. मात्र जर तुम्ही थंड ऐवजी गरम पाणी पिता तर ते शरीरासाठी अधिक फायद्याचे ठरेल. जाणून घेऊयात नेमकं गरम पाणी पिल्याने काय काय फायदे होतात.

1) गरम पाणी पिल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो. ज्यामुळे हृदयाचे आजार कमी होतात. त्याचप्रमाणे पचनयंत्रणा देखील सुधारते.

2) भूक कमी लागणाऱ्यांनी एका ग्लासात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून ते गरम पाणी प्या. यामुळे चांगली भूक लागते.

3) त्वचेबाबत कसलेही त्रास होत असतील तर गरम पाणी पिणे कधीही फायद्याचे ठरू शकते. यामुळे त्वचा चांगली होते.

4) सतत वजन वाढत असेल तर गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून ते पाणी प्या तसेच रोज जेलवल्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाणी पिल्यास फॅट कमी होते.

5) गरम पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली होते. ऍसिडिटी सारख्या अनेक पोटाच्या आजारापासून सुटका मिळते.

6) बदलत्या हवामानात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून वाचण्यासाठी देखील रोज गरम पाणी प्यायला हवे.

7) शरीरात टॉक्सि जमा झाल्याने सुरकुत्या पडतात त्यामुळे व्यक्ती कमी वयाचा असून देखील म्हातारा वाटू लागतो.

8) गरम पाण्याच्या पिण्याने केसांचे देखील खूप पोषण होते.

9) गरम पाणी पिल्याने सांध्याची वेदना कमी होते तसेच गरम पाण्यामुळे स्नायूंचा त्रास देखील दूर होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/