मूलचंदानी खून प्रकरणात आरोपींना पोलिस कोठडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील तरुणाच्या खून प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 30 जुलै प्रयत्न पोलिस कोठडी सुनावली आहे.

अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (25, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (20, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि अरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (26, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपीला वकील न मिळाल्याने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अॅड. अतिश लांडगे यांची नियुक्ती केली. पोलीस कोठडी सुनावताना न्यायालयाने पोलिसांना देखील काही निर्देश दिले आहेत. उर्वरित आरोपींना शोधायचे आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि हत्यार जप्त करायचे आहे. मुख्य आरोपीला लवकरात लवकर शोधून अटक करावी.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पाइसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 24) रात्री पोलिसांनी स्पाइसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील जप्त करण्यात आली आहे. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर यापूर्वी पिंपरी पोलिसांनी आमिन फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –