Jio च्या 99 रुपयाच्या ‘ऑफर’नं सगळ्यांचीच केली बोलती ‘बंद’, 56 दिवस सर्वकाही फ्री, ‘या’ तारखेपर्यंत घ्या ‘लाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  रिलायन्स जिओने नाराज झालेल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी नुकतीच एक 99 रुपयांची ऑफर सादर केली आहे. या ऑफरची खरी किंमत 399 रुपये आहे. परंतु, जीओच्या कॅशबॅक अंतर्गत ती 99 रुपयांत मिळत आहे. जीओने यासाठी अमेझॉन पे सोबत भागीदारी केली आहे, ज्या माध्यमातून 399 रुपयांच्या रिचार्जवर 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे, ज्यामध्ये ही ऑफर 99 रुपयांत मिळेल.

56 दिवसांसाठी सर्वकाही मोफत
रिलायन्स जीओच्या या ऑफरमध्ये 56 दिवसांची वैधता आहे, ज्यमध्ये सर्व सुविधा मोफत आहेत. या ऑफरमध्ये जीओ नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास 2000 आययुसी मिनिट दिले आहेत. 56 दिवसांसाठी प्रत्येक दिवशी 1.5 जीबी डेटा आहे.

15 फेब्रुवारीपर्यंत घ्या लाभ
या ऑफरसोबत उपलब्ध कॅशबॅक ऑफर 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत वैध आहे. जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर 15 फेबु्रवारीपर्यंत घेऊ शकता. ज्यामध्ये 300 रुपयांपर्यंत कॅशबॅक आहे.