कुलभूषण जाधव प्रकरणी ICJच्या ‘कायदेशीर सल्लागार’ रीमा ओमर यांचे ३ ‘ट्विट’, निकाल भारताच्या पक्षात काय ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेसंदर्भ आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निकाल देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलेली नसली तरी त्यांना पाकिस्तानने आतापर्यंत काउन्सिलर ऍक्सेस दिलेला नव्हता. तो काउन्सिलर आता ऍक्सेस देण्यात येणार आहे. दरम्यान, ICJ च्या कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी ट्विट केले आहे. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखाली १६ न्यायाधीशाच्या बेंचने हा निकाल देणार आहेत. या निकालाकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

काय आहे हे प्रकरण ?
कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील ‘रॉ’साठी काम करीत असल्याचा आरोप पाकिस्ताने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते.

काय झाली होती शिक्षा ?
पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेवर हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती लावली. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा न देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला होता.कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवलेले आरोप रद्द ठरवून त्यांची शिक्षा रद्द करावी आणि तातडीने त्यांची सुटका करावी, अशी मागणी भारताने केली.कुलभूषण जाधव यांना पुरावे नसताना अटक करण्यात आल्याचे भारताने सांगितले.

हरीश साळवे यांनी मांडली होती बाजू
कुलभूषण जाधव यांना पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !