आता ‘या’ अभिनेत्रीची मराठी बिग बॉसच्या घरात ‘एंट्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची चर्चा कायम रंगते. यंदाच्या सीझनमध्ये कोणकोणत्या कलाकारांचे चेहरे पाहायला मिळतील याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मयुरी देशमुख मराठी बिग बॉस २ मध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सरळीकडे पसरत आहे.

या विषयी मयुरीने जरी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसली तरी तिला बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वासाठी विचारल्याचे समजते. बिग बॉस मराठीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजामध्ये प्रेक्षकांसमोर आले. त्याप्रमाणे असेच विविध क्षेत्रातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य म्हणून आले तर काय होईल ? हे पाहणे रंजक असणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे तर्क लावले होते. जसे की गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर नावाची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र, तिने याबाबत खुलासा ही केला. तिने सोशल मिडियावर सांगितले की, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची पाहण्याची वेळ आली आहे.

मला बिग बॉस शो पहायला आवडते आणि मी हा शो पाहण्यासाठी खुप उत्सुक आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याचे वृत्तात सांगितल्याप्रमाणे यात काही सत्य नाही. ही सगळी अफवा आहे. बराच काळ चालणाऱ्या या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा माझा विचार नाही. या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व टिमला ‘ऑल द बेस्ट’

प्रत्येक सिझनमध्ये घरातील स्पर्धकांमधील वाद यामुळे बिग बॉसची चर्चा खुप रंगते. छोट्या पडद्यावरील मराठी ‘बिग बॉस पर्व -2’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या खुप चर्चेत आहे. सर्व प्रेक्षक हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.