ना उद्घाटनाचा, ना बॅनरबाजीचा थाट, आ.संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका दिवसात केली वाट !

सिमेंटच्या नळ्या टाकून खासबाग ते मोमीनपुरा पर्यायी रस्ता केला सुरू ; नागरिकांनी मानले आभार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कसलाही गाजावाजा न करता, उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा थाट न करता आ. संदिप क्षिरसागर यांनी बिंदूसरा नदी पात्रात एका दिवसात पर्यायी रस्ता बनवत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. बिंदूसरा नदी पात्रात खासबाग ते मोमीनपुरा या पर्यायी रस्त्यावर सिमेंटच्या नळ्या टाकून पक्का रस्ता करण्यात आला आहे. अवघ्या एका दिवसात आ.संदिप क्षिरसागर यांनी सदरील रस्त्याचे काम मार्गी लावल्याने नागरिकांनी आभार मानले असून आपले प्रश्न, व्यथा, समस्या, अडचणी आणि विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बीडकरांना आ. संदिप क्षिरसागर यांच्या रुपानं आपल्या हक्काचा माणुस भेटला आहे.
Beed
गुरूवारी पहाटेच आ. संदिप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम यांच्यासह आदींनी मोमीनपुरा भागातील नागरिकांच्या समस्या व स्वच्छता कामाची पाहणी केली. यावेळी खासबाग ते मोमीनपुरा भागाला जोडणारा बिंदूसरा नदी पात्रातील पर्यायी रस्ता झाला तर लोकांची होणारी गैरसोय, त्रास दुर होईल. गेल्या अनेक वर्षात ज्यांनी नारळ फोडली, उद्घाटने केली अशांनी प्रत्यक्षात मात्र कामे केली नसल्याचे बोलून दाखवत सदरील काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी आ. संदिप क्षीरसागर यांच्याकडे केली. यावर आ.संदिप क्षिरसागर यांनी सकाळी 10 वाजल्यापासून बिंदूसरा नदी पात्रात ठाण मांडत खासबाग ते मोमीनपुरा हा पर्यायी रस्ता करुन घेतला. सर्व यंत्रणा कामाला लावली. हे करत असतांना कसलाही गाजा-वाजा उद्घाटनाचा, बॅनरबाजीचा त्यांनी थाट केला नाही. अगदी सरळ आणि साध्या पध्दतीने यंत्रणेमध्ये सहभागी होत सदर रस्त्याचे काम मार्ग लाऊन घेतल्याने या भागातील नागरिकांनी आ. संदिप क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.
Sandeep Kshirsagar
आ. संदिप क्षिरसागर जे बोलतात ते करुन दाखवतात !
बीड मतदार संघात शहरी आणि ग्रामिण भागात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीस वर्षाच्या काळात येथे सत्ता भोगणार्‍यांनी साधे मुलभूत प्रश्नही सोडले नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विधानसभेेच्या निवडणुकीत नवनिर्वाचीत सदस्य झाल्यानंतर आ.संदिप क्षिरसागर यांनी दुसर्‍याच दिवशी शेतकर्‍यांच्या पिकाच्या नुकसानीचा प्रश्न लाऊन धरत उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत पंचनाम्याचे आदेश काढले. संदिप क्षिरसागर बांधावर गेले, शेतकर्‍यांना आधार दिला, उघड्यावर पडू देणार नाही, हा शब्द देत शहरातील प्रश्नांकडेही लक्ष घातलं. खा. प्रितमताई मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानी संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या आढावा बैठकीत आ.संदिप क्षिरसागर यांनी मतदार संघातील अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करत मुक्ता लॉन्स, सोमेश्वर मंदिरासमोरील, जालना रोडवरील, बार्शी रोडवरील खड्ड्याचा प्रश्न मांडत दुसर्‍याच उभे राहून काम करुन घेतले. नगर रोडवरीलही खड्डे बुजवून घेतले. त्यामुळे भैय्या जे बोलतात ते करु दाखवतात हे कामावरुन दिसून आले आहे.
sandeep Kshirrsagar

Visit : Policenama.com