खासदार डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीने सुटला द्राक्ष निर्यात परवाना ‘पेच’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बंगलोर सीमेवरील भारतीय द्राक्ष निर्यातीला आवश्यक परवान्यांचा अडसर खा.डॉ.भारती पवार यांच्या मध्यस्तीतून दूर झाला. द्राक्ष निर्यातीचा पेच सुटल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून सीमेवर थांबविण्यात आलेले जवळपास 100 ते 150 कंटेनर बांग्लादेशकडे रवाना झाले आहेत.

सदर प्रकरणी द्राक्षउत्पादक शेतकरी व व्यापारी वर्गाने खा.डॉ.भारती पवार यांचेशी संपर्क साधून निर्यातीला येणाऱ्या अडचणी सांगितल्या नंतर त्यावर लगेचच तातडीने खा.डॉ.भारती पवार यांनी अपेडा व वाणिज्य विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली व परवाना संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.

या सूचनांची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत निर्यातीस तातडीने परवानगी दिली. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे सुमारे 8 कोटी रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचले. त्यामुळे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त करून खा.डॉ.भारती पवार यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले.

पुन्हा एकदा खासदार डॉ.भारती पवार ह्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेल्या व त्यांच्या होणाऱ्या संभावित नुकसानीतुन मोठा दिलासा मिळवून दिला असल्याने त्या शेतकऱ्यांसाठी संकट मोचन ठरल्या.