गुन्हेगार तरुणाशी लग्न करणाऱ्या चुलत बहिणीचा खून 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी- चिंचवडमधील दळवीनगर परिसरात गुन्हेगार तरुणासोबत राहणाऱ्या, लग्न करणाऱ्या चुलत बहिणीचा गळा आवळून भावाने खून केला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडे चार वाजता घडला.

ऋतुजा कांता वाघ (१८, रा. पंचतारानगर, आकुर्डी) हीचा खून झाला आहे. तर चुलत भाऊ संतोष भोंडवे (२५) याला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ऋतुजाच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिची आई आणि आजी दळवीनगर येथे राहतात. दीड वर्षापासून ऋतुजा ही गुन्हेगार असणाऱ्या कांत्या वाघ यांच्यासोबत राहत होती. कांत्या सोबत लग्न केले असल्याचे सांगत होती. यातून त्यांच्या घरात वारंवार वाद होत होते.

आज दुपारी ऋतुजा ही आईकडे आली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. ऋतुजा हिने आजी आणि आईला मारहाण केली. त्यांतर ऋतुजाच्या आईने घडलेला प्रकार संतोषला सांगितला. संतोष घरी गेला आणि त्याने ऋतुजाला बेदम मारहाण केली. यावेळी चिडलेल्या संतोषने घरातील परकरची नाडी काढून ऋतुजाचागळा आवळला. यामध्ये ऋतुजाचा मृत्यु झाला. चिंचवड पोलिस घटनास्थळी पोहचले असून फिर्याद घेण्याचे काम सुरु आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही
रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या
हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा
निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा