मोदी साहेब आपल्या आशीर्वादाने ही लढाई नक्कीच जिंकेल : प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – १६-नांदेड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ भाजपा कडून प्रताप पा चिखलीकर यांना उमेदवारी मिळताच काँग्रेस कडून थेट अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना अनेक खासदार लोकसभेवर निवडून गेले व भाजपा सरकारची सत्ता स्थापन झाली. जनतेतून भाजपा सरकार असे न म्हणता केवळ मोदी सरकार या नावाने ओळख पटली.

भाजपा लोकसभा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (नांदेड) व हेमंत पाटील (हिंगोली) यांच्या प्रचारार्थ नांदेड मध्ये दि ०६ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली या सभेस लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, नांदेड ते बाभळी पर्यंत बारमाही पाणी बसून आहे. मराठवाडा सुजलाम सुफलाम होऊन शेतकऱ्यांची मान उंचावनार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावा, मुखेड आणि देगलूर मध्ये वरदान ठरणाऱ्या लेंडी प्रकल्प गेल्या २५ ते ३० वर्षा पासून अर्धवट स्थितीत आहे त्यासाठी आपण भरीव निधी देऊन पूर्ण करावा असे प्रताप पाटील चिखलीकर नरेंद्र मोदींना म्हणाले. त्याचबरोबर नांदेड-देगलूर आणि बिदर रेल्वे मार्गास भरीव निधी दिल्याबद्दल चिखलीकर यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

शीख बांधवांची दक्षिण काशी असलेले नांदेड ही गुरुगोविंदसिंग यांची भूमी आहे. त्या गुरुद्वारासाठी कलम ११ स्थापित होत आहे. त्या गुरुद्वारा बोर्डासाठी कलम ११ स्थापित होऊ नये म्हणून शीख बांधवांनी राज्य शासनाकडे निवेदन केले आहे. त्या निवेदनाचा विचार करावा असे देखील ते यावेळी बोलले. नांदेड-लोहा-लातूर हा मोठा महामार्ग आहे. त्यासाठी भरीव निधी देऊन त्याचे काम त्वरित चालू करावे यांसह अनेक मागण्या नांदेड करांसाठी प्रताप पाटील यांनी नांदेड च्या नागरिकांसमक्ष पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडल्या.

यावेळी विजयीसंकल्प सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील, लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शृंगारे, परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव, आ.सुरजितसिह, आ.राम पाटील रातोळीकर, आ.डॉ. तुषार राठोड, आ. सुभाष साबणे, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, सुर्यकांता पाटील(माजी मंत्री), डॉ. माधवराव किन्हाळकर (माजी मंत्री), डी. बी. पाटील (माजी खासदार), ओमप्रकाश पोकर्णा (माजी आमदार), आनंद जाधव, डॉ.अजित गोपछडे, डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार, शामसुंदर शिंदे, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण साले, नागनाथ घिसेवाड सोबत शिवसेना भाजपा रिपाई चे अनेक कायकर्ते पदाधिकारी व लाखोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते.