पैगंबर जयंती, ईद-ए-मिलाद सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन : सुनील फुलारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुक सौहार्दपुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मिरवणुक सौहार्दपूर्ण वातावरणात व्हावी, यासाठी मिरवणुकीत डी जे चा वापर करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीला अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ, वाहतूक पोलीस निरीक्षक सी एम निंबाळकर तसेच कोंढव्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार ,सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मोरे , संदीप मधाळे , उपनिरीक्षक संतोष शिंदे ,तसेच मुस्लीम समाजाचे धर्मगुरु, कारी ईदरीस ,माजी आमदार महादेव बाबर , माजी नगर सेवक राईस सुंडके , तानाजी लोणकर , ऑल कोंढवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज शेख, हसीना ईनामदार , कमलदीप कोंढवा समाज सेवक जफर खान ,यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती व ईद ए मिलाद हे उत्सव आहेत. यानिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका शांततेमध्ये पार पाडण्याकरीता मंडळांनी डी जे सिस्टीमचा वापर करु नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

याच काळात रामजन्म भूमी, बाबरी मस्जिद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर समाजात प्रतिकुल प्रतिक्रिया उमटू नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याबाबतचा निकाल काहीही असला तरी त्याबाबतचे चांगले अथवा वाईट प्रतिक्रिया व्हॉटस अ‍ॅप व इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पत्रकबाजी करुन टिका टिपण्णी करु नये. अशी टिका करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल असे प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कावाई करण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व धर्मीय लोकांनी कोंढवा व पुणे शहरात शांतता राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like