अजित पवार यांच्या पुन्हा उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बाबत पार्थ पवार म्हणतात . .

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर पहिल्यांदा आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी मंत्री पदाची शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खाते वाटप देखील पार पडणार आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शपथविधी नंतर आनंद व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात शपथ घेताना देखील पार्थ पवार त्यांच्या सोबत होते आणि आज महाविकास आघाडीमध्ये देखील अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी देखील पार्थ पवार उपस्थित होते. त्यामुळे त्यांना दोनीही शपथविधी सोहळ्याबाबत विचारले असता दोनीही वेळी राज्यपाल सारखेच होते मात्र मुख्यमंत्री वेगळे होते अशी मिश्किल प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे त्याबाबत बोलताना नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी आदित्य नक्कीच चांगले काम करून दाखवेल अशी अपेक्षा यावेळी पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे. या सरकारने सर्व जनतेसाठी चांगले काम करावे सर्वांच्या समस्या सोडवाव्यात अशा आशावाद पार्थ पवार यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांची शपतविधी सोहळ्यासाठी दांडी
आज झालेल्या महाविकास आघाडीच्या शपतविधी सोहळ्यासाठी संजय राऊत अनुपस्थित होते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पत्रकार परिषदा घेऊन उठवलेले रान राज्यातील प्रत्येकाने पाहिले आहे त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी या शपतविधी सोहळ्यासाठी दांडी मारल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/