दारुची ‘तस्करी’ करणारा पोलीस कर्मचारी ‘बडतर्फ’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना पोलीसांकडूनच दारुची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणात नागपूर येथील सिताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस शिपाई सचिन हांडे याला अटक करण्यात आली होती.

अवैध धंदे करणाऱ्या पोलीस शिपाई सचिन हांडे याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अवैध धंद्यात गुंतलेल्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. आयुक्तांच्या कारवाईमुळे अवैध धद्यांना आश्रय देणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

काय आहे प्रकरण
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारुची तस्करी करताना वरोरा पोलिसांनी दोघांना अटक केली होती. ही कारवाई ९ जुन रोजी करण्यात आली होती. या कारवाईत अटक करण्यात आलेल्यापैकी सचिन हांडे हा सिताबर्डी पोलीस ठाण्यात कार्य़रत होता. तर प्रणव म्हैसकर हा एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याची माहिती तपासात समोर आली होती. या दोघांकडून विदेशी दारूच्या ८ पेट्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून एकूण ९ लाख रुपेय किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

नागपूरमधून चंद्रपूर येथे अवैध दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती वरोरा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार वरोरा पोलिसांनी नंदोरी टोल नाक्यावर नाकाबंदी करून इटॉयॉस क्रॉस गाडी आडवून तपासणी केली होती. त्यावेळी गाडीच्या डिकीमध्ये दारुचे बॉक्स पोलिसांना आढळून आले होते.

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Video : ‘बिग बी’ची नात नव्या नवेलीने केलं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ‘वर्कआऊट’, ‘HOT’ व्हिडीओ व्हायरल

‘या’ ४ दिग्गज कलारांच्या शरिरात ‘ही’ कमरता, कधीही नाही आले लक्ष्यात कोणाच्या