दुष्काळाचे सावट दुर होण्यासाठी प्रविण मानेंचे गणरायाच्या चरणी ‘साकडे’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोनाई गुळ कारखाण्याचा १३ वा गाळप हंगाम रोलर पुजन कार्यक्रम सोमवारी सकाळी सोनाई गुळ कारखाणा वरकुटे पाटी ता. इंदापूर येथे कारखान्याचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांचे हस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर सालाबादप्रमाणे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री गणेश मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणाही प्रवीण माने यांचे हस्ते करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी गणरायाचे दर्शन घेताना इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेले दुष्काळाचे सावट दुर होऊ दे अशी मागणी गणरायाच्या चरणी केल्याची माहीती प्रविण माने यांनी दिली.
Pravin-Mane
सोनाई परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दशरथ (दादा) माने यांचे मार्गदर्शनाखाली सोनाई गुळ कारखान्याचा १३ वा हंगाम लवकरच सुरू होत आहे. या हंगामासाठी कारखान्याकडे ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, उसाच्या नोंदी, कारखाण्याच्या शेती विभागामार्फत पूर्ण झालेल्या आहेत. मशनरी मेंन्टनन्सचे काम पूर्णत्वाकडे आले असुन कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे उद्दीष्ट आहे. चालु वर्षी दुष्काळामुळे पशुधन जगविण्यासाठी इंदापूर तालुक्यात कारखान्याच्या वतीने निरवांगी व रेडणी या ठिकाणी चारा छावण्या चालु करण्यात आल्या असुन त्यामध्ये गोरगरिब शेतकर्‍यांची जणावरे मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहेत.परंतु चारा छावण्यामुळे तालुक्यातील उसाचे क्षेत्र कमी झाले असुन शेतकर्‍यांचे एकरी उत्पादनही घटले असल्याचे प्रविण माने यांनी सांगीतले.

कारखान्याची स्थापना होऊन आज १३ वर्षे होऊन गेली. परंतु शेतकर्‍यांचे उसाचे बील मात्र आम्ही प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांना वेळेवर संपूर्ण रक्कमेस अदा केलेले आहे. तसेच ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, कंत्राटदार, यांचे पेमेंट दर पंधरवड्याला अदा केलेले आहे. त्याचबरोबर मागील वर्षीचे कमिशन, डिपाॅझीटची रक्कमही पूर्ण स्वरूपात अदा करण्यात आलेली असुन चालु हंगामासाठीही शेतकरी वर्गाने आपला ऊस कारखान्यास गाळपास देवुन सहकार्य करण्याचे आवाहन सर्व शेतकरी वर्गाला प्रविण माने यांनी केले आहे. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून अकोले गावातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी पाच लाख रूपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल आकोले ग्रामस्थांच्या वतीने बाबासाहेब दराडे, कैलास वणवे (गुरूजी), काशिनाथ दराडे, योगेश दराडे, माऊली शिंदे, पांडूरंग दराडे यांचे हस्ते प्रविण माने यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, कर्मचारीवर्ग, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –