अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा अटकेत, मुलीची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिबवेवाडी परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली तर मुलीची सुटका केली.

गणेश चिन्नु खडावत (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून मैत्रिणीच्या बहिणीच्या साखरपुड्याला जाते असे सांगून गेली. परंतु ती घरी परतली नाही. त्यामुळे तिला कोणी तरी अज्ञाताने पळवून नेले असावे. असा कुटुंबियांना संशय आला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्य़क्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली. तेव्हा गणेश चिन्नु खडावत याने तिला फूस लावून सिकंदराबाद येथे पळवून नेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई शितोळे, पोलीस शिपाई गुजर यांनी पटानचेरू सिकंदराबाद येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने दाखल गुन्ह्यातील आरोपी व अल्पवयीन मुलीचा कसोशीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी मंगळवारी खडावत याला अटक करून त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मेघा निंबाळकर करत आहेत.

ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, महिला पोलीस उपनिरीक्षक मेघा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई शितोळे, पोलीस शिपाई गुजर यांनी केली.

आरोग्यविषयक वृत्त

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like