लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४ हजार १५१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल ४ हजार १५१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरात ३६ पिस्तूले जप्त केली आहेत. तर शहरातील ५८४ परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदान शांततेत पार पडावे. यासाठी शहर पोलिसांकडून तडीपार करणे, सीआरपीसीची कलमे, मुंबई प्रोहिबीशन अक्ट यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. त्यासोबतच शहरात गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान पोलिसांनी एकूण ३६ पिस्तूले जप्त केली आहेत. तर परवानाधारकांकडून ५८४ शस्त्रे जमा केली आहेत. ज्यांच्यावर किमान एक गुन्हा दाखल आहे, अशा ७ हजार २७१ जणांची यादी गुन्हे शाखेने तयार केली आहे़. गेल्या दोन दिवसांपासून गुन्हेगारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे़.

कारवाई

– तडीपार – ६५

– एमपीडीए – १०

– सीआरपीसी कलम ११० – १८७

– सीआरपीसी कलम १५१ (१) – २३३

– सीआरपीसी कलम १४९ – १६९१

– मुंबई प्रोहिबीशन अक्ट ९३ – ३६

– मुंबई पोलीस अक्ट कलम ६८ – ४४६