‘या’ कारणामुळे पुण्यातील 4 पोलिसांचे ‘निलंबन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाचा धडका सुरूच असून, सोमवारी एकाच पोलीस ठाण्यातील तिघांचे निलंबन प्रकरण ताजे असताना पुन्हा बुधवारी शहरातील एका अधिकाऱ्यासह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. यात एक पोलीस ठाण्यांसह मुख्यालयातील दोघांचा समावेश आहे.

उपनिरीक्षक भीमराव भिकजी मांजरे, पोलीस शिपाई गोपाळ हरी दाभाडे आणि पो. शि. रविंद्र रामचंद्र निगडे व गंगाधर बुपराव वागलगावे अशी निलंबन करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई रवींद्र निगडे आणि गंगाधर वागलगावे हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस होते. गेल्या महिण्यात एक परदेशी नागरिकाला पडल्यानंतर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी या दोघांवर देण्यात अली होती. परंतू तुमच्या कायदेशीर कर्तव्यामध्ये निष्काळजीपणाने केल्यामुळे परकीय नागरिक कायदेशीर निगराणीतून पळून गेला होता. याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात या दोघांचे निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मुख्यालयाचे वीरेंद्र मिश्र यांनी दिले आहेत.

तर कोंढवा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मांजरे आणि कर्मचारी दाभाडे हे नेमणुकीस होते. त्यावेळी त्यांच्या सांगण्यावरून एक खासगी व्यक्तीला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन दिवसापूर्वी एसीबीने लाच स्वीकारताना पडकले होते. याप्रकरणी खासगी व्यक्तीला अटक केली होती. तर दोघे पळून गेले होते. याप्रकणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर चौकशी करून या दोघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. त्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी दिले आहेत.

Visit : Policenama.com