फक्त ४०० रुपयांत मिळणार शुद्ध हवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता अवघ्या ४०० रुपायांमध्ये घरातील हवा शुद्ध करता येणार आहे. कारण भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या दिल्ल्ली (IITD) च्या माजी विद्यार्थ्यांनी ननैनोक्लीन एसी फिल्टर नावाच मशीन बनवलं आहे. ते बाजारामध्ये अवघ्या ४०० रुपयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्त खर्चिक नसल्याने ती मशीन सर्व नागरिकांना खरेदी करता येईल.

हि मशीन १ तासात ९० टक्के धूलिकण आणि प्रदूषकांना एकाच वेळी रोखू शकते. आणि घरातील एसीच्या थंड हवेला साफही करू शकते. अशा या मशीनची किंमत कमी आहे. काम मात्र ती जास्त करणार आहे.

आईआईटीच्या प्रतीक नावाच्या माजी संशोधक विद्यार्थ्याने हि मशीन बनवली आहे. हि मशीन आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून या मशीनमुळे श्वसनाच्या अनेक आजारांना आळा बसणार आहे.

मशीनबद्दल बोलताना प्रतिकने सांगितलं कि, डब्लूएसओच्या एका रिपोर्टनुसार आपण आपला ८० टक्के वेळ आपल्या घरात घालवतो. बाकीचा १० टक्के वेळ आपण बाहेर घालवतो. त्यामुळं घरातील हवा शुद्ध करणं महत्वाचं आहे. त्यामुळं आम्ही हे मशीन बनवलं. याचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला एसीच्या बाहेरच प्लस्टिकच झाकण काढून तिथे एक जाळी लावली लागेल. मगच आपल्याला शुद्ध हवा मिळेल. त्या मशीनचा उपयोग प्रतिकने घर, ऑफिस आदी ठिकाणी केला आहे. त्याचा परिणाम त्यांना चांगला मिळाला. म्हणून त्यांनी ते मशीन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. असं प्रतिकने सांगितलं.