राखीचे क्रिकेट मैदानावरील सेक्सी फोटो आणि बोल्ड डान्स व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ यांमुळे नेहमी चर्चेत असणारी आणि स्वत:ला नेहमीच ठेवू पाहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सेक्सी व्हिडीओ आणि अंगप्रदर्शन करणारे फोटो टाकत राखी सावंत नेहमी स्वत:ला चर्चेत आणू पहात असते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या राखी सावंतबाबत जाणून घेण्याची इच्छा तिच्या चाहत्यांना असते. त्यामुळे राखी नेहमीच सोशलवर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आताही राखीने काही हॉट अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या ते व्हायरल होत असल्याने राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

राखीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे. राखी या फोटोंमध्ये अंगप्रदर्शन करत असल्याचंही दिसत आहे. राखीने फेंट ब्लू कलरची शॉर्च जिन्स घातली आहे. लाल रंगाचा टॉपही तिने घातलेला दिसत आहे. अनेक चाहत्यांना तिचे हे फोटो आवडल्याचे दिसत आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

नकुतेच राखीने बॉक्स क्रिकेट लीगच्या तयारीसाठी एक फोटोशुट केले आहे. त्यात राखी विविध पोज देताना दिसत आहे. यावेळी राखीने फलंदाजीचाही आनंद घेतला आहे. त्याचेच हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. या सगळ्यात राखीचा टिकटॉकचा डान्स करतानाचाही व्हिडीओ समोर आला आहे.

छोट्या पडद्यावरील काही कलाकारही या फोटोशुटमध्ये सहभागी झाले होते.

राखीचा बोल्ड डान्स मात्र या सर्व फोटोंमध्ये लक्षवेधक ठरल्याचे दिसते आहे.