मुस्लिमांप्रति राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला : समीर सय्यद

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील वरवंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली सभा ही विविध मुद्द्यांमुळे चांगलीच चर्चेत राहिली आहे. याच सभेत मुस्लिम सामाजाचे नेते हाजी सोहेल खान यांना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे आता मुस्लिम समाजातही राष्ट्रवादी बाबत रोष व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरवंड येथे सभा झाली होती.

या सभेमध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष हाजी सोहेल खान यांना व्यासपीठावर जागा नसल्याने त्यांना अक्षरशा स्टेजच्या खाली कार्यकर्त्यांमध्ये बसावे लागले. यानंतर त्यांनी व्यासपिठावर जाऊन आपल्या समाजातर्फे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांना मदत जाहीर केली यावेळीही त्यांना व्यासपीठावर आसलेल्या खुर्च्यांवर कुणीही बसायला जागा दिली नाही यामुळे नाईलाजाने त्यांना व्यासपीठावरच मांडी घालून खाली बसावे लागले. ही बाब मुस्लिम समाजातील अनेक युवकांना खटकली असून त्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी